⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शहरातील ई-बससेवेला ‘या’ महिन्यापासून सुरुवात होणार?

शहरातील ई-बससेवेला ‘या’ महिन्यापासून सुरुवात होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । केंद्र शासनाच्या पीएम-ई बससेवेसाठी मनपाच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मंजुरीनंतर आठवडाभरात केंद्र शासनाकडून हिरवा कंदील दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण सोपस्कार पार पाडून फेब्रुवारी दरम्यान, जुन्या बसस्थानकाच्या जागेतूनच शहराच्या बसेस सुटणार आहेत.

२०२४ मध्ये शहरातून बसेस धावतील असा अंदाज वर्तवला जात आहे. शहर बससेवेसाठी महापालिकेने राज्य शासनाला पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता राज्यातील २३ शहरांचा प्रस्ताव एकत्रितरित्या राज्याकडून केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे. आठवडाभरात त्यालाही मंजुरी मिळेल. त्यानंतर केंद्र शासनाकडून जळगाव शहरासाठी ५० बसेस खरेदीची प्रक्रीया ईईएसएल कंपनीकडून होईल. महावितरणकडून चार्जंग स्टेशन तसेच त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजनांसाठी डीपीआर तयार केला जाणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसचे मार्ग व तिकीट दर निश्चित केले जातील. १५ फेब्रुवारीपर्यंत शहरातून बसेस धावतील असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, जळगाव महानगरपालिकेकडून जुन्या बसस्थानकाचाच वापर केला जाणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.