⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

राष्ट्रवादीतर्फे सिनेट मतदार नाव नोंदणीला सुरवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सिनेट मतदार नाव नोंदणीला सुरवात झाली असून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी घेतलेल्यांनी नवीन मतदार नोंदणी व जुने मतदारांचे नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

मतदार नोंदणीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. दरम्यान, काही अडचण आल्यास ऑफिस- शॉप क्र 1 जे.टी एम संकुल पं समिती समोर,यावल. येथे संपर्क करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिसभा सदस्य (सिनेट मेंबर) निवडणूक (2022) लवकरच.
विद्यापीठाचा संपूर्ण प्रशासकीय-शैक्षणिक-आर्थिक कारभार, शैक्षणिक धोरण, शैक्षणिक शुल्क, विद्यार्थ्यांचे हक्क आदी सर्वच महत्वाच्या विषयांवर विद्यापीठाच्या अधिसभेत महत्वाचे निर्णय घेतले जात असतात.

या निवडणुकीत तुम्ही सहभागी व्हायलाच हवं!
मतदान करायलाच हवं!
तुम्ही फक्त एवढंच करायचं की, पदवीधर मतदार म्हणून स्वत:ची नोंदणी करुन घ्यायची.

यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतील-
पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)
निवासाचा पुरावा आधारकार्ड ,मतदार कार्ड , लायसेन्स या पैकी एक .
पासपोर्ट फोटोबी -1

image 2
राष्ट्रवादीतर्फे सिनेट मतदार नाव नोंदणीला सुरवात 1