⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन समारोह संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आज राष्ट्रीय विज्ञान दिवस समारोह संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक सरला विंचूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून सरिता पाटील ह्या होत्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे विज्ञान विभाग प्रखुक राधा बोरसे यांनी मांडले. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती माता तसेच डॉ.सी.व्ही. रामण यांच्या प्रतीमेचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे व डॉ.सी.व्ही रामण यांच्या बद्दल विशेष माहीती सांगितली. तसेच काही विद्यार्थ्यानी डॉ.सी.व्ही.रामण यांची वेषभुषा साकारली होती. यात प्रणव महाजन, राज चव्हान, योगेश्वरी हे विद्यार्थी होते. यावेळी विज्ञान प्रदर्शन ही भरवण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक, उप शिक्षक राधा बोरसे, किरण महाजन, पि.डी. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल विशेष माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकांक्षा पाटील व मंजीरी सपकाळे या विद्यार्थ्यांनीने केले. तर आभार प्रदर्शन तनुश्री ने केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.