राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर भीषण अपघात ; चार जण जागेवरच ठार, तीन गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर होणारे अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच आता या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीय.

बुलढाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालायं. तसेच तीन जण गंभीर जखमी झालेत. सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर तांदुळवाडी पुलावर विटांनी भरलेला एक ट्रक जात होता. यावेळी समोरुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची या ट्रकला जोरात धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, ४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला.

तर या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींना मलकापूर येथे कुटीर रुग्णालय हलविण्यात आलं आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या भीषण अपघातात विटांनी भरलेल्या ट्रकचा पुढील भाग चिरडला गेला.

ट्रकला समोरून जोरात धडक बसल्याने समोरील काचा फुटल्या तसेच ट्रक वाहन चालकाचा यात जागीच मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.