---Advertisement---
गुन्हे एरंडोल

महामार्गावर उभ्या वाहनाला मागून आलेल्या वाहनाची धडक ; एक ठार, तीन जखमी

accident
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । पार्किंग लाईट न लावता धोकादायक परिस्थितीत उभ्या असलेल्या वाहनास मागून आलेल्या वाहनाने ठोस दिली. त्यात त्या वाहनात बसलेला कालू खाटीक हा फार झाला व तीन जण जखमी झाले. ही दूर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर एरंडोल पातरखेडे दरम्यान शहा डिझेल पंपि नजीक २१ जूलै २०२१ रोजी पहाटे ५.३० वाटेच्या सुमारास घडली.

accident

या बाबत एरंडोल पो.स्टे. सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, ट्रक क्रं. WB 23 E 4007 हा आम रस्त्यावर पार्किंग लाईट न लावता धोकादायक परिस्थितीत थांबला होता. MH 19 CY 6030 क्रमांकाच्या वाहनाने उभे असलेल्या वाहनास धडक दिली. त्यात ६०३०  वासना मध्ये मागील बाजूस बसलेले कालू खाटीक हा ठार झाला व अन्य तिन जण जखमी झाले. जखमींची नांवे समजू शकले नाही.

---Advertisement---

या प्रकरणी टाटा एन्ट्रा कंपनी चा ( ६०३०)  गाडी चालक सूरज रामदास बैरागी या. अजयनगर वरणगाव याने एरंडोल पो. स्टे. ला  फिर्याद दिल्यावरुन महामार्ग वर उभ्या असलेल्या ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. विकास देशमुख , संदीप सातपूते ,अकील मुजावर, हमीद तडवी हे पुढील तपास करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---