⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | नाथाभाऊंना उमेदवारी तर मुंडेंना डच्चू : ओबीसी समाज भाजपा विरोधात जाणार ?

नाथाभाऊंना उमेदवारी तर मुंडेंना डच्चू : ओबीसी समाज भाजपा विरोधात जाणार ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ ।  पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांचे तिकीट भाजपने कापले तर राष्ट्रवादीने नाथाभाऊंना दिलेला शब्द पाळला यामुळे ओबीसी समाज देखील आता भाजपा पासून दूर जातो कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण भाजप ओबीसी समजा विरोधात आहे असे कित्येकदा महाविकास अघाडीकडून सांगण्यात येत आहे. मात्र राष्टवादी काँग्रेसने खडसेंना उमेदवारी दिल्याने आणि भाजपने मुंडेंचे (PANKAJA MUNDE) तिकीट कापल्याने आता महाविकास अघाडीच्या आरोपांना झुकते माप मिळत आहे.

२०१४ साली भारतीय जनता पक्षाची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात आली तेव्हा नाथाभाऊंचा त्यात मोठा वाटा होता. एकनाथराव खडसे हे तेव्हा तब्बल १२ खात्याचे मंत्री होते. मात्र दिवस बदलले आणि खडसे भाजपमध्ये एकाकी पडले. खडसेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत खडसेंचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत खडसेंऐवजी गोपीचंद पाडळकर यांना संधी भाजपने खडसेंना डच्चू दिला. आपले कुठे पुनर्वसन होईल, भोसरीचा अहवाल जाहीर होईल आणि आपण निर्दोष असल्याचे जगासमोर येईल असे खडसेंना वारंवार वाटत होते मात्र मनाप्रमाणे काही घडलेच नाही. उलटपक्षी खडसेंनाच भाजपात त्रास होऊ लागला. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यावेळी त्यांना दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला नाथाभाऊंना विधानपरिषदेची उमेदवारी देत ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवले.

मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांची उमेदवारी नाकारल्यामुळे ओबीसी समाज भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. २०१९ साली भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी वेळेस त्यांच्या परळी मध्ये पराभव झाला असा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये तर ‘भाजपा हा माझ्या बापाचा पक्ष आहे, कोणी कितीही वाईट वागणूक दिली तरी तो मी सोडणार नाही’ अशा शब्दात त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले होते. पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांना उमेदवारी मिळेल अशी आशा सर्वांनाच होती मात्र प्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्याचा आक्रोश पंकजा मुंडे समर्थक संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. ओबीसीला वाचवायचा असेल तर ओबीसीचे नेते विधिमंडळात जायला हवे अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र जे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं ते भाजपाने न केल्याने आता ओबीसी मतदार त्यांच्यापासून दूर गेला असल्याचे म्हटले जात आहे.

हे देखील वाचा : तरीही त्याच पंकजा मुंडेंवर अन्याय : खडसेंची प्रतिक्रिया

यावर सकाळीच पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, भारतीय जनता पक्ष वाढावा यासाठी मुंडे, महाजन, खडसेंनी भाजपला बहुजन समाजाचा चेहरा देण्याचे कार्य केले. एकेकाळी भाजपची ओळख ब्राम्हण, मारवाडी लोकांचा पक्ष अशी होती, ती बहुजन नेतृत्वाने खोडून काढला. अश्या मुंडे महाजनांवर भाजपने अन्याय केला आहे. पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांना उमेदवारी न देता भाजपने मुंडेंच्या घराण्याचार अन्याय केला आहे

यामुळे ओबीसी समाजाला खुश करत एकनाथराव खडसे यांचा मान राखत व दिलेला शब्द पाळत राष्ट्रवादी काँग्रेसने राजकारणाची योग्य केली खेळली तर दुसरीकडे हाती आलेली संधी भारतीय जनता पक्षाने सोडली असे देखील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे आता या घटनेनंतर पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाज कशा प्रकारे प्रकट होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह