---Advertisement---
बातम्या

राष्ट्रवादीला खिंडार ; नशिराबाद येथील माजी सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. कारण येथील राष्ट्रवादीच्या माजी सरपंच व ग्रा.पं सदस्यांसह इतरांनी शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

shivsena 1

नशिराबाद ग्रामपंचायत बरखास्थ होऊन नव्याने नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पहिल्यांदा निवडणुक होत आहे. त्यामुळे पक्षांपक्षांतर प्रवेश व पक्ष बांधणीला सुरूवात झाले आहे. दरम्यान आज गुरूवार ७ ऑक्टोबर शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी नशिराबाद नगरपरिषदे निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नशिराबाद येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास धनगर यांच्या उपस्थितीत नशिराबादचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माळी, आबा पाटील, पराग देवरे, युसुफ शोख (भंगारवाले), मनोज माळी, महेश पाटील, किरण पाटील, सत्तार शेख, संजय महाराज, सुपडु चौधरी अन्य जणांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेने प्रवेश केला आहे.

---Advertisement---

याप्रसंगी शहराध्यक्ष विकास धनगर, दगडू काका माळी, विनायक धर्माधिकारी, बापू चौधरी, शिवसेना युवक जिल्हाप्रमुख चेतन बऱ्हाटे, बापू चौधरी, कैलास नेरकर, विजय वाणी, प्रभाकर महाजन यांच्यासह सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---