---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

नाशिक पदवीधर निवडणुक : जळगाव जिल्ह्यातील ३५ हजार मतदार ठरवणार…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून तब्बल ६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. ज्यात सत्यजित तांबे हे एक मोठे नाव आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात असलेले ३० हजार मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Nashik graduate election)

vote 1 jpg webp webp

एकीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने, भाजपने कोणताही उमेदवार न दिल्याने आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवाराबाबत अद्यापही गोंधळ असल्याने तांबे यांना हि निवडणूक सोपी जाईल असे म्हटले जात आहे.

---Advertisement---

हे उमेदवार रिंगणात

सत्यजित सुधीर तांबे (अपक्ष), रतन कचरु बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी) अनिल तेजा (अपक्ष), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर (अपक्ष), अविनाश महादू माळी (अपक्ष), इरफान मो इसहाक, (अपक्ष), ईश्वर पाटील (अपक्ष), बाळासाहेब घोरपडे (अपक्ष), ॲड. जुबेर नासिर शेख (अपक्ष), ॲड.सुभाष राजाराम जंगले (अपक्ष), नितीन सरोदे (अपक्ष), पोपट बनकर (अपक्ष), शुभांगी पाटील (अपक्ष), सुभाष चिंधे ( अपक्ष) ,संजय माळी (अपक्ष).

जिल्हानिहाय मतदार

जळगाव जिल्हा – ३५ हजार ५८
नगर जिल्हा – १५ हजार ६३८
नाशिक जिल्हा – ६९ हजार ६५२
धुळे जिल्हा – २३ हजार ४१२
नंदुरबार जिल्हा – १८ हजार ९७१

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---