उत्तर महाराष्ट्रात नारी शक्तीचा गौरव ; डॉ. केतकी पाटील

मार्च 14, 2024 8:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नुकतीच करण्यात आली.

ketki patil jpg webp

यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, रावेर, जळगाव आणि दिंडोरी येथे महिला उमेदवार घोषित झाले असून ही उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण पाच लोकसभा मतदार संघा लपैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महिलांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने आणि नेतृत्वाने महिलांचा गौरव केला आहे अशी भावना जनसामान्यात प्रतिबिंबित झाली आहे. या त्यांच्या निर्णयाबद्दल भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी मनस्वी आभार व्यक्त केले. तसेच सौ. पंकजा मुंडे-पालवे, डॉ.भारतीताई पवार, डॉ.हिना गावित, स्मिताताई वाघ, रक्षा खडसे या सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा डॉ केतकी पाटील यांनी दिल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now