जळगाव जिल्हा

देशी दारू दुकानाविरुद्ध नारी शक्ती आक्रमक, ..अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । चिनावल येथील भर वस्तीत देशी‎ दारू विक्रीचे दुकान सुरू‎ करण्यासाठी ग्रामपंचायतीने‎ परवानगी देऊ नये, अन्यथा‎ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन‎ करू असा इशारा महिला-पुरूष असे तब्बल २०० जणांनी‎ समोवारी येथील सरपंच व ‎ग्रामसेवकाला निवेदन दिले.‎

चिनावल येथील कुंभारखेडा ‎रस्त्यावरील गट क्रमांक ८८८ प्लॉट ‎क्रमांक ११ व १२ या जागेवर चंद्रकांत ‎डोंगर भंगाळे यांनी किरकोळ देशी‎ दारू विक्रीचे दुकान सुरू‎ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ना ‎हरकत प्रमाणपत्राची मागणी केली ‎आहे. ३१ जानेवारीच्या ग्रामसभेतील ‎चर्चेतून हा मुद्दा पुढे आला. ही‎ माहिती कानावर येताच कुंभारखेडा‎ रस्त्यावरील सर्व रहिवाशांचे पित्त‎ खवळले. या देशी दारू विक्रीच्या‎ दुकानामुळे रहिवाशांना भविष्यात‎ ‎विनाकारण मनस्ताप होऊ शकतो.‎ परिसरातील मुलांना देखील व्यसन‎ लागू शकते. तसेच या जागेच्या‎ बाजूला महिलांचे शौचालय आहे.‎ महिलांचा येण्या-जाण्याचा रस्त्यावर देशी दारू विक्रीच्या‎ दुकानासमोरून आहे. त्यामुळे‎ दारूड्यांच्या उपद्रवातून महिला‎ सुरक्षेचा मुद्दा गंभीर होऊ शकतो. या‎ जागेच्या परिसरात शाळा, मंदिर व‎ ‎कब्रस्तान आहे. या सर्व ठिकाणचे‎ पावित्र्य पाहता देशी दारूच्या‎ दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देऊ‎ नये, असा पवित्रा आंदोलनकर्त्या‎ रहिवाशांनी घेतला.‎

‎‎सरपंचांना दिलेल्या निवेदनावर भावना पाटील, कल्पना भिरूड, प्रियंका भिरूड, विमल‎ अंगाडे, सविता भंगाळे, मनीषा पाटील, ललिता कंडारे, मंगला नेमाडे, लक्ष्मी कंडारे, सोनाबाई कंडारे, पद्माबाई कंडारे,‎ छाया कंडारे, कमलाबाई काळे, ज्योती कंडारे, विजया पाटील, अनिता कंडारे, शिवानी कंडारे, एकता कंडारे, शिवानी‎ कंडारे, मीनाक्षी नेमाडे, प्रतिभा भंगाळे, वंदना बोनडे, लीना वायकोळे, कल्पना पन्नासे, मालती मालखेडे, अर्चना बढे‎ अशा सुमारे १९३ महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सर्वांनी देशी दारूच्या दुकानाला तीव्र विरोध दर्शवला.‎

Related Articles

Back to top button