⁠ 
शनिवार, मे 18, 2024

नांद्रीच्या सिध्दी चौधरीचे नीट परिक्षेत घवघवीत यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील सिध्दी चौधरी या विद्यार्थीनीने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिचे नातेवाईकांमध्ये व गावात सर्वत्र कौतूक होऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील रहिवाशी व जिल्हा परिषद शाळा खौशीचे मुख्याध्यापक हिंमत चौधरी व जि.प. शाळा मंगरुळ येथील विद्यार्थी व शिक्षिका निलम चौधरी यांच्या सुकन्या सिध्दी हिने नीट परीक्षेत ७२० गुण पैकी ६०९ गुण मिळवून गौरवास्पद व घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल डॉ. सिद्धी चौधरीचे सर्वत्र कौतुक होऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिने कोरोना काळात बराच काळ घरून अभ्यास केला होता व त्यानंतर राजस्थान मधील कोटा येथे क्लास केला होता. आता तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतून एमबीबीएस करून गोरगरिबांच्या सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तिला या यशासाठी तिचे शिक्षकवृंद व आई वडिल व भाऊ व सर्व परिवाराचे मार्गदर्शन लाभले.