नांद्राला लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । तालुक्यातील नांद्रा येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने कानडदा – भोकर जि. प. गटातील वीस गावांतील मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मातंग समाजाचे राजेंद्र चव्हाण गुरुजी, गणेश सपकाळे, कैलास जाधव, संजय बाविस्कर, निखिलभाऊ सपकाळे, सोमा वैराडे, नानाभाऊ सपकाळे, पांडुरंग मोरे, सुरेंद्र गायकवाड, छोटु अवचिते, प्रकाश सोनवणे, यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जयराम सोनवणे, गोकुळ चव्हाण, प्रवीण पाटील, नानाभाऊ पाटील, भाऊसाहेब पाटील , सुरेश पाटील, शांताराम पाटील, अशोक सोनवणे, मनोज पाटील, समाधान पाटील , चेतन सोनवणे, भैया चव्हाण , भगवान धनगर, आणि मातंग समाजातील महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यान श्री देवकर व ईश्वर पाटील यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन ईश्वर पाटील (लालासर ) आणि मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी केले होते.