⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | शेतात दादर कपात असताना दिसले बिबट्याचे तीन पिल्ले आणि….

शेतात दादर कपात असताना दिसले बिबट्याचे तीन पिल्ले आणि….

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्‍यातील नांद्रा परिसरालगतच्या वनविभागाला लागुन असलेल्या शेतात आज दादर पिकाची कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले असता त्या ठिकाणी त्यांना बिबट्याचे तीन छोटे पिल्ले आढळून आले आहे. बछडे आढळून आल्‍याने मजुरवर्ग काम सोडून पळाले.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा शिवारा लगतचा जंगलाला लागून असणारा ताडमळ्यामध्ये शेतजामिन असणारे येथील संजय रामराव पाटील यांच्या मालकीच्या गट क्रं. १७५ च्या शेतात दि. १२ रोजी दादर कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले होते. यावेळी त्यांना शेतात तीन छोटे पिल्ले निदर्शनास आली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने भूषण तावडे व इतर शेतकरी यांनी तात्काळ ही गोष्ट वन विभागातील कर्मचारी यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली,

त्यानुसार काही क्षणातच त्या ठिकाणी वन विभागाचे वन क्षेत्र पाल डि. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील भिलावे, जगदिश ठाकरे, अमृता भोई, ललित पाटील, प्रकाश सूर्यवंशी, रामसिंग जाधव,राहुल कोळी,सचिन कुमावत यांचे पथक दाखल होऊन त्यांनी तेथेच त्या शेतात एका ठिकाणी तिघे पिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी छावणी केली जेणे करून बिबटी मादी येऊन त्यांना सुखरुप घेऊन जाईल व त्याठिकाणी संपूर्ण वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत व प्रसंगी राञीला नाईट व्हिजन कॕमेरा लावून नजर ठेवण्यात येणार आहे परंतु आद्याप शेतकरी वर्गाच्या जमिनीत अजूनही दादर, मक्का, गहू, कपासी असे पिके काढण्याचे असून त्यामुळे शेतात एकटे व्यक्ती, महिलावर्ग, किंवा बालके जाण्यास घाबरत असून पुन्हा एकदा संपूर्ण वनखात्यात वन विभागातील संरक्षण कंपाऊंडचा विषय ऐरणीवर आला आहे जर त्या जंगलाला कंपाऊंड करण्यात आले तर वन्य प्राणी गावाकडे वाटचाल करणार नाही व प्रसंगी अशा या अजून घडणाऱ्या हिँस्ञ घटना घडणार नाही. मागेही झाडावर बिबट्या चढण्याचं त्याबरोबरच गावालगतच्या शेताजवळ गाई वासरांचा फडशा पाडल्याचा घटना ताज्या असतानाच आताही हि बिबट्या मादी आपल्या पिलांना सोबत कुठपर्यंत या परिसरात घेऊन वास्तव्य करते किंवा निघून जाते यावर आता वन विभागाला बारीक लक्ष ठेवावे लागणार असून प्रसंगी रेस्क्यू ऑपरेशन ही करावे लागू शकते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.