भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या बंद, रेल्वेने नियमित करण्याची घोषणा केली होती
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-एलटीटी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. काही महिण्यापुर्वी रेल्वेने या गाडीला प्रतिसाद मिळत असलयाने नियमित करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या एक्स्प्रेस नियमित करण्यास नकार दिला असून, आता या गाडीच्या विशेष फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. ही गाडी कायमस्वरूपी रद्द होताच प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने १७६६५/६६/६७/६८ नांदेड-एलटीटी भुसावळ मार्गे धावत होती सुरवातीला काही दिवस ही गाडी योग्य वेळेवर धावत होती. गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्डाने २९ ऑगस्ट रोजी एक पत्र जारी करून ही गाडी नवीन क्रमांक देऊन नियमित करण्याची घोषणा केली. रेल्वे बोर्डाने पत्र देऊन तीन महिने उलटले तरी दक्षीण मध्य रेल्वेने ही गाडी नियमित तर केली नाहीच, उलट धावणाऱ्या विशेष फेऱ्याही बंद केल्या.