---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

नाना पटोलेंना बसणार मोठा धक्का ! अध्यक्षपद जाणार ?

nana patole (1)
---Advertisement---

जळगाव लाइव्ह न्यूज । २७ मे २०२३ । काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांचे पद लवकरच जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बदल होणार असून काँग्रेसला नव अध्यक्ष मिळू शकतो असा चर्चा सध्या सुरू आहेत.

nana patole (1)

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पाठवले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काँग्रेसचे विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पाटोले यांच्या विरुद्ध सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचेही म्हटले जात आहे. विदर्भातील नेते सुनील केदार, विजय वडेंटीवार, शिवाजीराव मोघे यांनी देखील नाराजी व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे. अशावेळी लवकरच पटोले यांचे पद जाऊ शकते

जर नाना पटोले यांचे पद गेले तर अनेक जण इच्छुक आहेत असेही म्हटले जात आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. अशावेळी राज्यभरात काम करण्यासाठी मतदारसंघात मजबूत पकड असलेली व्यक्ती ही प्रदेशाध्यक्ष असली पाहिजे असे मत हाय कमांडचे असल्याचे म्हटले जात आहे, यामुळे सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील चर्चा सध्या सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---