⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | घरकुल यादीतून नाव वगळले, लाभार्थ्याचा उपोषणाचा इशारा

घरकुल यादीतून नाव वगळले, लाभार्थ्याचा उपोषणाचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील सारबेटे बुद्रुक येथील लाभार्थ्यांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत “ड’ यादीत असताना ती वगळल्याने संबधित लाभार्थ्याने १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी सामूहिक उपोषणाचा इशारा दिला आहे. तर पैशाची मागणी पूर्ण न झाल्यानेच हा प्रकार केल्याचा आरोप गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

याबाबत सारबेटे बुद्रुक अमजदखां सत्तारखाँ मेवाती यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ‘ड’ यादीतील माझे व इतर लाभार्थ्यांचे नावे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाले होते. परंतु, माझ्यासह इतर लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची ग्रामसेवकांनी मागणी केली हाेती. परंतु माझी आर्थिक परिस्थिती गरिबीची असून माझे वडील वा माझ्या नावावर एक एकर ही शेती नाही. आजही मी झोपडीत राहताे. असे असूनही माझे नाव ‘ड’ यादीतून वगळल्याचा आराेप मेवाती यांनी केला माहितीचा अधिकाराखाली ग्रामसेवकाकडून माहिती मागितली असता त्यांनी हेतूपुरस्सर घरकुल योजनेतून मला वगळल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर आजही प्रत्येक लाभार्थ्यांकडून १५०० रुपये अमळनेर पंचायत समितीत नेमलेले कंत्राटी अभियंता व ग्रामसेवक हे दोन्ही संगनमत करून लूट करत आहेत. मी गेल्या चार महिन्यांपासून गटविकास अधिकारी यांच्याकडे या संदर्भात वारंवार लेखी तक्रार केली असून आजपर्यंत न्याय मिळला नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांसह १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी अमळनेर तहसील कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्याचा इशारा अमजदखा मेवाती यांनी दिला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह