⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | शरद पवार गटात प्रवेश करताच दिलीप खोडपे मंत्री महाजनांवर कडाडले

शरद पवार गटात प्रवेश करताच दिलीप खोडपे मंत्री महाजनांवर कडाडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप खोडपे यांनी काही दिवसापूर्वी भाजपचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेश करणार असल्याची घोषणा केली होती. अखेर आज शनिवारी दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली. दिलीप खोडपे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याने गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.

काही दिवसापूर्वीच दिलीप खोडपे सर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खोडपे यांनी आपण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने त्यांनी आज जामनेर येथे आयोजीत कार्यक्रमात हातामध्ये तुतारी घेतली.

यावेळी जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तेव्हा उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट केला. या प्रसंगी आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, रवींद्रभैय्या पाटील, एजाज मलीक, श्रीराम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. यातच राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिलीप खोडपे म्हणाले की, हा माहोल पाहून मी आभार नाही तर तुमच्या पुढे नत मस्तक होत आहे. एवढे प्रेम तुम्ही दिले. मी इच्छुक उमेदवार नव्हतो, मात्र जनतेची मागणी होती जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी नेत्यांचे ही आभार मानतो.

मी राजीनामा दिला तो सहज दिला नाही. किती पद्धतीने डावलण्यात आले. दुरून आलेल्या लोकांची कामेही ही करत नव्हते, त्याच वाईट वाटत होते. अतिशय कठीण काळात आपण गिरीश महांजन यांचा प्रचार करत होतो, नाथाभाऊ आमच्यासाठी यायचे गिरीश महाजन प्रबळ झाल्यानंतर त्यांनी नाथाभाऊ यांना पक्षातून बाहेर ढकलले. मंत्रीपदानंतर त्यांच्याकडून अपेक्षा किती फोल झाल्या हे दिसत आहे. मी राष्ट्रवादीमध्ये जात असल्याचं, त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना माझी जात आठवायला लागली,मात्र आपण कधीही जात पाहिली नाही, असं दिलीप खोडपे म्हणाले. यांची जागा यांना आता दाखवायची आहे. साम दाम दंड भेद वापरून हे दादागिरी करत आहेत. आता दडपशाही झाली तर मी माझ्यावरील वार अंगावर घेईल, असं दिलीप खोडपे म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.