जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी कंपनीत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. भारत सरकारची कंपनी असलेल्या नालको म्हणजे नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) ने भरती जाहीर केली आहे. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. NALCO Recruitment 2026

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे. इच्छुकांनी या कालावधीत nalcoindia.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. NALCO Bharti 2026

रिक्त पदाचा तपशील?
या भरतीमध्ये मेकॅनिकल इंजिनियरसाठी ५९ जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी २७ तर केमिकल इंजिनियरसाठी २४ जागा आहेत. एकूण ११० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून फुल टाइम मेकॅनिकल इंजिनियरिंग ,इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/पॉवर इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग/केमिकल इंजीनियरिंग/एमटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्कोअरकार्डदेखील असावे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
इतका पगार मिळेल
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
कशी होणार निवड?
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड GATE-2025 स्कोअरवर आधारित होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹100/-]






