मोठी बातमी! लाच घेताना नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात, महसूल विभागात खळबळ

मार्च 16, 2023 7:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. २५ हजाराची लाच घेताना धरणगाव येथील नायब तहसीलदारासह कोतवाल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. जयंत पुंडलिक भट असे नायब तहसीलदाराचे नाव असून राहूल नवल शिरोडे असं कोतवालचे नाव असून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

dharangaon lach jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
तक्रारदार हे वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आणि डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाला राहूल नवल शिरोडे यांनी सुरूवातीला तक्रारदाराला ३० हजाराची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २५ हजार रूपये देण्याचे ठरविले.

Advertisements

त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवारी १६ मार्च रोजी दुपारी सापळा रचला. यावेळी नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाल राहूल नवल शिरोडे हे तक्रारदारकडून २५ हजाराची लाच घेतांना पोलीसांनी रंगेहात पकडून अटक केली. एसीबी पथकाने केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now