नड्डा यांची सभा फेल झाल्याने शिवसैनिक आक्रमक !
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची औरंगाबाद येथे झालेली सभा फेल ठरल्याचे म्हटले जात आहे.कारण यामुळे त्यांचे भाषण सुरु असताना नागरिक खुर्चीवरून उठून गेले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली विराट जाहीर सभा असा दावा भाजपतर्फे करण्यात आला होता. मात्र भाजपचा आज चांगलाच फ्लाॅप शो झाला. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे त्यांना डिवचलं जात आहे.
तर झालं अस कि, नड्डा यांच्या सभेवेळी लोक उठत असतांना प्रसार माध्यमांचे कॅमेरे ते टिपण्यासाठी वळाले. यावेळी व्यासपीठावरील नेत्यांचे चेहरे पडले असल्याचे पाहायला मिळाले.यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे त्यांना डिवचलं जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्च्यांचा फोटो ट्विट करत अहो नड्डा पहा हा खड्डा, असा टोला लगावला आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घ्यावी, ती ठाकरेंनीच. ऐड्यागबाळ्याचे ते काम नाही, असा टोला ठाकरे गटाकडून भाजपला लगावण्यात येते आहे. सोशल मिडियावर देखील नड्डांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्याचीच चर्चा कालपासून सुरू आहेत.