जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मोठी पदभरती निघाली आहे. विशेष म्हणजेच या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. NABARD Recruitment 2024
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. २ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. तर २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. या भरतीद्वारे एकूण १०८ जागा भरल्या जाणार आहे. NABARD Bharti 2024
पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी शैक्षणिक अट फक्त १० वी पास आहे. म्हणजे साल २०२४ मध्ये तुम्ही १० वी पास केली असेल तरी देखील या पदासाठी अर्ज करू शकता आणि नोकरी मिळवू शकता.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : General/OBC: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
किती पगार मिळेल: सध्या, सुरुवातीचे मासिक एकूण वेतन अंदाजे रु. 35,000/-, रु.17270-590(4)-19630-690(3)-21700-840(3)-24220-1125(2)-26470-1400(4)-32070- 1900(3)-37770 ( 20 वर्षे) गट ‘क’ मधील ऑफिस अटेंडंटना लागू आहे आणि ते वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि ग्रेड भत्ता यासाठी पात्र असतील
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
परीक्षा (Online): 21 नोव्हेंबर 2024
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा