जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँकत भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच ८ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.

नाबार्ड ने ग्रेड ‘अ’ च्या सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी ही भरती जाहीर केलीय. पात्र उमेदवार नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट www.nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ असणार आहे.

नाबार्डमधील भरती मोहिमेत एकूण ९१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या असिस्टंट मॅनेजर ग्रॅड ए (Rural Development Banking Service/RDBS) साठी ८ जागा रिक्त आहेत.असिस्टेंट मैनेजर Grade ‘A’ (Legal Service) पदासाठी २ जागा रिक्त आहेत. असिस्टेंट मॅनेजर Grade ‘A’ (Protocol & Security Service) 4 पदे भरती केली जाणार आहे.

भरतीसाठी आवश्यक पात्रता?
नाबार्डमधील भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.याचसोबत ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ एमबीए/पीजीडीएम/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
परीक्षा शुल्क :
या भरती मोहिमेत अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरायचे आहेत.





