---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

माझं नाव सावरकर नाही ; गांधी माफी मागत नाहीत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत असं उत्तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषेत दिले. मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यप्रकरणा वरून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

rahul gandhi sawarkar jpg webp webp

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. लोकशाहीवर हल्ला होत असून याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. नरेंद्र मोदी यांचे अदांनीसोबत काय संबंध आहेत आणि ते शेल कंपन्यांचे २०,००० कोटी कोणाचे आहेत? असा प्रश्न मी विचारला होता. तो पैसा अदांनीचा नाही, अन्य लोकांचा आहे. मग ते कुणाचे आहेत, असा प्रश्न मी केला. त्यामुळे माझा आवाज दाबण्यात प्रयत्न करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

---Advertisement---

तुम्ही विदेशात केलेल्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी तुम्हाला माफी मागण्यास सांगितले, कोर्टात माफी मागण्यास सांगण्यात आले होते, तुम्ही याबाबत काय विचार करता? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. या प्रश्नाच उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले. माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---