जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । आईच्या चारीत्र्यावर वडिलांनी संशय घेतल्यामुळे पोटाच्या मुलांनीच आपल्या बापाचा धारदार चाकूचे सपासप वार करत खून केल्याची धकाकदायक घटना पाचोरा शहरात घडली आहे. ही धक्कादायक पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. संजय बंकट खेडकर (४६) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून खून प्रकरणी संशयीत आरोपी रोहित खेडकर (२२) व प्रतीक खेडकर (२४) या भावंडांना अटक करण्यात आली आहे.
‘जळगाव लाईव्ह’ला मिळालेल्या माहिती नुसार पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक असून त्यांचे पाचोरा शहरात इलेक्ट्रीक दुकान आहे. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याने कुटुंबात शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले व मध्यरात्री पर्यंत हा प्रकार सुरूच होता. आईच्या चारीत्र्यावरील संशयामुळे चिडलेल्या संशयीत रोहित व प्रतीक यांनी घरातील धारदार चाकूने वडिलांच्या पोटावर, पाठीवर व डोक्यावर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक भारत कातकाडे, पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील व कर्मचार्यांनी धाव घेतली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.