⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला; डोक्यात लाकडी दांडका, दगड घालून तरुणाचा निर्घूण खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा वाढताना दिसत असून चोपडा तालुक्यातील अडावद येथे ३५ वर्षीय तरुणाची निर्घूण हत्या झाल्याची खळबळजनक घटना आज दि. १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. बापू हरी महाजन (वय- ३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलं आहे. या रहस्यमय खूनाच्या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवीत काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद येथील भगवान नगरमध्ये मोकळ्या जागेवर एका तरुणाचा खून झाल्याची वार्ता आज सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले. काही वेळातच मयताची ओळख पटून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सदर तरुण हा लोखंडे नगरमधील बापू हरी महाजन असल्याचे उघडकीस आले आहे.

या तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री बापूचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घून खून केल्याचे समोर आले आहे. मयताचे शव विच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मयताच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. अडावद पो. स्टे. हद्दीत महिनाभरातच झालेल्या या तिसऱ्या खूनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे घेतले व तपासाला गती दिली. या रहस्यमय खूनाच्या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवीत काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.