गुन्हेचाळीसगाव

खळबळजनक : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालत खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरात एका खळबळजनक घटना समोर आलीय. पत्नीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालत खून केल्याची घटना घडलीय. निनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला पती कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे घटना?
मध्यप्रदेशातील मोहरतमाळ येथील कुवरसिंग पावरा हे दाम्पत्य गेल्या वर्षांपासून मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात सालाने काम करतात. शेतातच एका शेडमध्ये ते राहत होते. दरम्यान कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले आहे. असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून पत्नी निनुबाई पावरा हिची निघृणपणे हत्या केली. ही घटना काल रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण,धर्मराज पाटिल, सुभाष पाटिल,मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनेबाबत पती कुवरसिंग यांना विचारपूस केली असता. त्यांनीच पत्नीची कुऱ्हाड डोक्यात घालून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला मेहूणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे परिसरात भादवी कलम- ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button