माजी उपसरपंचाच्या निर्घृण हत्येने जळगाव हादरले

मार्च 21, 2025 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगावातील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाचा निर्घृण खून झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आलीय. युवराज सोपान कोळी असं खून झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. दरम्यान खुनाचे कारण अद्याप समोर आले नसून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडालीय.

maji sarpanch murder

कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment