गुन्हेजळगाव शहर

Murder : खुनातील संशयिताची जळगावात दगडाने ठेचून हत्त्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । शहरातील कासमवाडी भागात असलेल्या मैदानावर गुरुवारी रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. सागर वासुदेव पाटील असे या तरुणाचे नाव असून तो एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित असल्याचे समजते. पोलिसांना दोन संशयितांची नावे समजली असून त्यांचा शोध सुरू आहे.

ईश्वर कॉलनी परिसरात सागर वासुदेव पाटील हा तरुण कुटुंबियांसह राहत होता. मिळेल ते काम करीत होता. गुरुवारी रात्री तो नेहमीप्रमाणे घरी आला. कुटुंबियांशी गप्पा केल्यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास त्याला कुणीतरी बोलवायला आल्याने तो घराबाहेर पडला. सागरला दारूचे व्यसन असल्याने तो कासमवाडीतील मैदानावरच रात्री बसत होता. मैदानावर रात्रीच्या वेळी बरेच गुंड आणि टवाळखोर तरुण बसलेले असतात. परिसरातील नागरिकांनी देखील याबाबत अनेक वेळा तक्रार दिली आहे.

मैदानावर बसलेला असताना सागर पाटील याचा कुणीतरी दगडाने ठेचून त्याची हत्त्या केली. शुक्रवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडलेला प्रकार लक्षात आला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथक पोहचले आहे. हा खून कोणी व का केला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

दरम्यान, सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिसांना दोन संशयितांची नावे समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ देखील पोहचले आहे.

Related Articles

Back to top button