गुन्हेजळगाव शहर

जळगावात पुन्हा खून, तरुणाला भोसकले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यातील खुनाची मालिका अद्यापही थांबलेली नाही. शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाला चॉपरने भोसकण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय अजय चव्हाण वय-२३ रा.पिंप्राळा असे मयताचे नाव आहे. (murdar in jalgaon city)

जळगाव जिल्ह्यातील खुनाची मालिका सुरूच आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या घटना घडत असून किरकोळ कारणावरून देखील खून होऊ लागले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपसमोर दारूच्या अड्ड्यासमोर मोबाईलच्या वादातून दोन तरुणांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्याने दोन्ही गटातील १०-१५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. भारत बंडू राठोड या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून काही तरुणांचा वाद झाला. मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता आणखी तरुण त्यात पडले. अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार याच्या भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून बाळू पवार याने चॉपरच्या साहाय्याने अक्षय चव्हाण या तरुणावर वार केले.

गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून संशयिताचा शोध घेणे सुरू आहे.



Related Articles

Back to top button