⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

Bhadgaon : अत्याचार करून चिमुकलीची हत्या ; आरोपीला ताब्यात देण्यावरुन गावकऱ्यांची पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । भडगाव तालुक्यातून एक मोठी बातमी आहे. गोंडगाव येथील आठ वर्षीय चिमुकलीची हत्या करुन मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक उघडकीस आली होती. या हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडलीत. घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

नेमकी काय आहे घटना?
भडगाव तालुक्यातील गोंड गाव येथील ८ वर्षीय चिमुकली काकाच्या घरी टीव्ही पहायला गेली होती. त्यानंतर दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून ती घरी जेवायला निघाली. मात्र ती घरी पोहचलीच नाही. मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही म्हणून आई-वडिलांनी शोधाशोध सुरु केली. मात्र मुलीचा कुठेच थांगपत्ता लागेना. अखेर आई-वडिलांनी भडगाव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती.

मात्र १ ऑगस्ट रोजी गुरांच्या चाऱ्यामध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संशयित स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय 19 वर्षे) याला गुरुवारी (3 ऑगस्ट) पोलिसांनी अटक केली. त्याला गुन्ह्याच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत तीन पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याने मुलीवर लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली.