⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

रस्ते चकाचक करण्यासाठी मनपा विकत घेणार ‘इ-झाडू’

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । जळगाव शहरातील रस्ते साफ करण्यासाठी पुन्हा इलेक्ट्रीक झाडू फिरवला जाणार आहे, महापालिका शासकीय निधीतून एक मशीन खरेदी करणार आहे, तसेच ई वाहनांसाठी चार चार्जिंग स्टेशन शहरात उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव शहरातील रस्ते साफ करण्यासाठी तत्कालीन नगरपालिका असताना, इलेक्ट्रीक झाडू फिरत होते. नगरपालिकेने मक्ता तत्वावर हे झाडू घेतले होते. त्यामुळे रस्त्यावर धूळ साफ होत होती. कालांतराने हे झाडू बंद करण्यात आले.मात्र आता तब्बल २० वर्षांनी शहरातील रस्त्यावर इलेक्ट्रीक झाडू फिरणार आहेत.

राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक महापालिकेचा निधी देण्यात येत आहे. या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे. महापालिकेकडे तब्बल दोन कोटी ६० लाख रुपयांचा हा निधी प्राप्त आहे. या निधीतून महापालिकेने पर्यावरण रक्षण व स्वच्छतेच्या हेतूने दोन उपक्रम हाती घेतले आहेत. यात स्वच्छतेसाठी इलेक्ट्रीक झाडू खरेदी करण्यात येणार आहे.