⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महापालिका निवडणूक : भाजप आणि शिंदें गटाची आज महत्वपूर्ण बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. असे म्हटले जात आहे. याच अनुषंगाने आज शिंदे गट आणि भाजपची महत्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी ८ वाजता हि बैठक होणार आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची रणनीती काय असेल या संदर्भात ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि भाजपमधील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि भाजप युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुका या एकत्र लढण्याच्या चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमिवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.