---Advertisement---
एरंडोल

जेंव्हा नातेवाईक सोडतात साथ, तेव्हा सफाई कर्मचारी देतात हात

erandol (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील नगर पालिकेचे सफाई कर्मचारी हे कोरोना ग्रस्त व्यक्तीचे अंतिमसंस्कार करीत असुन अनेक नातेवाईक हे आपल्या कोरोना ग्रस्त नातेवाईक काचे अंतिम संस्कार करण्यासाठी सुद्धा घाबरतात. त्यांचे अंतिम संस्कार नगर पालिकेचे सफाई कर्मचारी हे पूर्ण सोपस्कार करुन अगदी योग्य पद्धतीने करीत आहेत.

erandol (1)

कर्मचारी हरचंद  अठवाल, शंकर, सचिन, चंदन, मुकेश, संतोष हे सफाई कर्मचारी मयत कोरोना ग्रस्त रुग्णाला प्लॅस्टिक मध्ये व्यवस्थित गुंडाळणे,त्यानंतर नगर पालिकेच्या ट्रॅक्टर मध्ये त्याचे प्रेत स्मशानात घेऊन जाऊन पूर्ण सोपस्कार करुन पूर्ण प्रेत जळून जाई पर्यंत त्या ठिकाणी लक्ष ठेऊन काम करीत आहेत.

---Advertisement---

याबद्दल सदर कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे तसेच कोरोना ग्रस्त मयत नातेवाईक हे त्यांचे आभार मानत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना प्रांताधिकारी विनय गोसावी, मुख्याधिकारी किरण देशमुख, नगराध्यक्ष रमेश परदेशी, आनंद दाभाडे, सुरेश दाभाडे व शहरातील सर्व नगरसेवक तसेच सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---