जळगाव जिल्हा
भुसावळमार्गे आज धावणार मुंबई ते वाराणसीसाठी विशेष एक्स्प्रेस
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२४ । भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगामात मुंबई ते उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची गरज लक्षात घेऊन मुंबई ते वाराणसीसाठी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय झाला आहे. विशेष ही गाडी भुसावळामार्गे धावणार आहे. यामुळे भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.
क्र. ०४२२९ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून आक शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता वाराणसीला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी येथे थांबेल. एक एसी-२ टियर, एक एसी-३ टियर, ७ स्लीपर क्लास, २ गार्ड ब्रेक व्हॅन व १२ जनरल सेकंड क्लासचा समावेश आहे. विशेष शुल्कावर बुकिंग १२ जूनपासून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर वwww.irctc.co.in येथे होईल