जळगावात पुढील दोन दिवसात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे राज्यातील विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात नीचांकी तापमानाचा विक्रम झाला आहे. तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते असा अंदाज आहे.

thandi tempreture

फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात तापमान वाढून थंडी कमी होईल असा अंदाज होता; परंतु आठवड्यापासून तापमान सतत कमी होत आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्याने उत्तरेकडून राज्यात गार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे वेस्टर्न डिस्टबन्सची स्थिती निर्माण झाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने गारठा आहे.

जिल्ह्यात रविवारी राज्यातील सार्वधिक कमी तापमानाची नोंद झाली होती. दिवसाचे तापमान तब्बल ३३ अंश असल्याने रात्री थंडीचा कडाका आणि दिवसा उन्हाचा चटका अशी स्थिती होती. जिल्ह्यात काल मंगळवारी जिल्ह्यात ७.५ अंश एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते असा अंदाज आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री जळगावात अतिथंडीने निराधार आणि बेघर चार जणांचा बळी गेला आहे. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now