जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हाला भारतीय नौदलात नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भारतीय नौदलाअंतर्गत येणाऱ्या मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये मोठी भरती निघाली आहे. सुमारे 301पदांसाठी ही भरती होणार असून अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 23 एप्रिल 2024 पासून सुरु झाली आहे. तर इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 10 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठी 8वी आणि 10वी पास अर्ज करू शकतात. Mumbai Naval Dockyard Bharti
कोणत्या पदांवर किती जागा आहेत?
One Year Training
1) इलेक्ट्रिशियन 40
2) इलेक्ट्रोप्लेटर 01
3) फिटर 50
4) फाउंड्रीमन 01
5) मेकॅनिक (Diesel) 35
6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07
7) मशीनिस्ट 13
8) MMTM 13
9) पेंटर (G) 09
10) पॅटर्न मेकर 02
11) पाईप फिटर 13
12) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 26
13) मेकॅनिक Reff. AC 07
14) शीट मेटल वर्कर 03
15) शिपराईट (Wood) 18
16) टेलर (G) 03
17) वेल्डर (G & E) 20
18) मेसन (BC) 08
19) I & CTSM 03
20) शिपराईट (Steel) 16
Two Year Training
21) रिगर 12
22) फोर्जर & हीट ट्रीटर 01
शैक्षणिक पात्रता:
रिगर: 08वी उत्तीर्ण
फोर्जर & हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
वयोमर्यादा :भारतीय नौदलातील या भरतीसाठी, उमेदवारांचे किमान वय 14 वर्षे आणि कमाल 18 वर्षे असावे.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
शारीरिक पात्रता :
भारतीय नौदलात या पदांवर भरती होण्यासाठी उमेदवाराची उंची 150 सेमीपेक्षा कमी आणि वजन 45 किलोपेक्षा कमी नसावे. तसेच, उमेदवाराची छाती विस्तारल्यानंतर 5 सेमीपेक्षा कमी नसावी. तसेच, दृष्टी 6/6 ते 6/9 असावी.
निवड कशी होईल?
भारतीय नौदलात या पदांवर नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर त्यांची अंतिम निवड होणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना 7700-8050 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल.