गुन्हेमहाराष्ट्र

मुंबई पुन्हा धोक्यात? एनआयएचा सुरक्षतेचा इशारा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ ।  राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एका धोकादायक व्यक्तीचा वावर मुंबईत होत आहे. असे या ई-मेलमध्ये लिहिले आहे. त्या व्यक्तीचे नाव सरफराज मेमन असे असल्याचा दावा करण्यात आला आहे. परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली हि व्यक्ती धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचे समोर आले आहे.

NIA ने आपल्या ईमेलमध्ये ‘धोकादायक’ या शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहायला सांगितलं आहे. मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे.

मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.

Related Articles

Back to top button