---Advertisement---
पारोळा

पारोळ्यात आज बहुभाषिक कविसंमेलन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । पारोळा येथील स्वामी समर्थ विद्यालयात तेजभूषण बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून रंगीन काव्य-धारा साहित्य कला मंचतर्फे खुले बहुभाषिक कवी संमेलन रविवार रोजी घेण्यात येणार आहे.
यावेळी पुरस्कार वितरण सोहळाही होणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ भगीरथ, सचिव भूषण बिऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

parola 1 jpg webp

खुल्या बहुभाषिक कवी संमेलनाचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रदीप पवार, स्वागताध्यक्ष म्हणून सदानंद भावसार असतील.

---Advertisement---

यांची उपस्थिती

याप्रसंगी माजी पालकमंत्री डाॅ. सतीश पाटील, स्वामी समर्थ विद्यालयाचे चेअरमन बापू नावरकर, दगडू महाराज, अमृत चौधरी, नगराध्यक्ष करण पवार, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक रोहन मोरे, अभिनेता, लेखक तथा कवी अजय बिरारी, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---