चाळीसगावात भाजपाचे रास्ता रोको आंदोलन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ ।  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाचे छत्रपती शिवाजी महाराज सिग्नल पॉइंटला सायंकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले तसेच नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि सरकारचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की राज्यामध्ये अनेक प्रश्न ज्वलंत असताना राज्यात अनेक समस्या असताना सरकार मात्र भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांना अटक केली याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच सरकारने आमचा अंत पाहू नये नाहीतर भारतीय जनता पक्ष यापुढे शांत बसणार नाही असेही आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.

याप्रसंगी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तालुका सेवक तसेच काही नगरसेवक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -