---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

एलसीबीची दमदार कामगिरी, मुक्ताईनगरचा दरोडा उघड, नवीन गॅंग जाळ्यात!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्राने मारहाण करून लुटल्याची घटना तीन दिवसापूर्वी नरवेल फाट्याजवळ घडली होती. व्यावसायिकाकडून मोटार सायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १७ लाख ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने नवीन टोळी पकडली आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.

crime 2022 09 03T132219.635 1 jpg webp

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात होते.

---Advertisement---

नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील ९ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किंमतीचे २ किलोचे चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपये रोख असा एकूण १७ लाख ८० हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले होते.

घटना घडल्यानंतर लागलीच एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह रवाना झाले होते. तीन दिवस सलग मागोवा घेतल्यानंतर पोलिसांना नवीन गॅंग पकडण्यात यश आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---