मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांचा पोलीस पाटलांकडुन सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना नुकताच सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीचा सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने येथील तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वतीने पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी जळगांव जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष मोहन मेढे, मुक्ताईनगर तालुका कार्यकारी अध्यक्ष कैलास बेलदार, खजिनदार दिलीप पाटील, सरचिटणीस महेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख संजय चौधरी, सुकळी पो.पाटील संदिप इंगळे, सातोड पो.पाटील विनोद पाटील, हरताळा पो.पाटील प्रदिप काळे, तरोडा पो. पाटील विठ्ठल पिवटे, मेळसांगवे पो. पाटील संजय पाटील व सारोळा पो. पाटील वाघ उपस्थित होते.
हे देखील वाचा :