जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगरातून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातून परिक्रमेला प्रारंभ होणार आहे. रवींद्र हरणे महाराज यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे.
तिर्थक्षेत्र किंवा धार्मिक स्थळी एक विशेष प्रकारची ऊर्जा व शक्ती निर्माण झालेली असते. ही ऊर्जा मंत्र, अखंड नामोच्चार, कथा, कीर्तन व भक्तांच्या अविरत वाहणाऱ्या झऱ्यातून निर्माण झालेली असते. ती भूमी यातूनच पुण्यभूमी म्हणून पुलकित झालेली असते. जी व्यक्ती असे तिर्थक्षेत्र व धार्मिक स्थळांची प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करतो त्याला निसर्गाच्या प्रत्येक ठिकाणच्या शुद्ध व मनाला प्रसन्न करणाऱ्या नैसर्गिक वातावरणाचा, वनस्पतींच्या सुगंधाच्या आयुर्वेदिक ऊर्जेचा लाभ होतो. ती ऊर्जा आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. मुक्ताईनगर ही भूमी देखील मार्कंडेय ऋषी, योगिराज चांगदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज असे संत-ऋषिमुनींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. आदि शक्ती मुक्ताई याच भूमीत संजीवन अंतर्धान पावल्या आहेत. आदि शक्ती मुक्ताईच्या या भूमीला परिक्रमेचा मार्ग असावा असा मनाशी संकल्प बांधून पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराजांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून निघणाऱ्या परिक्रमेचा मार्ग सुमारे ५० ते ६० किमी असेल. पायी प्रवासात दोन दिवसांचा मुक्काम करून परिक्रमा पूर्ण करता येईल. ही परिक्रमा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा त्यांचा मानस आहे.
संत मुक्ताईंची मूर्ती.
दरवर्षी आयोजनाचा मानस तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर-कोथळीची परिक्रमा या मार्गातून होणार आहे. भाविकांना अनन्य पुण्यसंचय करण्याचा योग मिळेल. पुढे भविष्यात दरवर्षी या परिक्रमेचे आयोजन करण्याचा मानस आहे. इच्छुकांनी भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून त्यात सहभागी व्हावे, रवींद्र महाराज, मुक्ताईनगर असा असेल मार्ग जुने मंदिर-वढवा फाटा-चांगदेव मंदिर, तापी-पूर्णा संगमावर नावेत बसून संगमाचे दर्शन. पुढे पैलतीर असलेल्या मेळसांगवे येथे सिद्धेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर परत मेळसांगवे-पंचाणे गावातून मुंढोळदे-चिचफाटा मार्गे उचंदा येथे पहिला मुक्काम. सकाळी पुरनाड फाटा-खामखेडा येथून जुना कुंड रस्ता मार्गे पिंप्री आकराऊत- सातोड-निमखेडी खुर्द येथे श्रावणबाळ टेकडीवरून हरताळा येथे आगमन व मुक्काम व परतीचा प्रवास.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी