जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांनी राष्ट्रवादीचे विनोद देशमुख यांच्याविरुद्ध धमकी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार रामानंद नगर पोलिसात दिली होती. दरम्यान, टेकवानी यांनी अर्ज देत सदर प्रकार गैरसमजुतीतून झाला असून तक्रार मागे घेतली आहे.
दि.२५ मे रोजी व्यावसायिक मुकेश टेकवानी यांनी विनोद देशमुख यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात तक्रार देत धमकी दिल्याची आणि शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मुकेश टेकवानी यांनी दि.३१ मे रोजी रामानंद नगर पोलिसात लेखी अर्ज दिला असून माझा आणि विनोद देशमुख यांच्यात कोणताही वाद झाला नसून सदर प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे सांगत तक्रार मागे घेतली आहे. तसेच पोलीस प्रशासन आणि विनोद देशमुख यांना झालेल्या मनस्तापाबद्दल क्षमा देखील मागितली आहे.