⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मार्फत मोठी पदभरती निघाली आहे. लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (मराठी) आणि लघुलेखक (इंग्रजी) या पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार MPSC, mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 253 पदे भरली जातील. यामध्ये लघुलेखक (उच्च श्रेणी) साठी 62, लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 100, लघुलेखक-टंकलेखक (मराठी) साठी 52 आणि लघुलेखक इंग्रजीसाठी 39 आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ मे २०२२

रिक्त जागा तपशील

एकूण पदांची संख्या- 253

लघुलेखक (उच्च श्रेणी) – ६२
लघुलेखक (निम्न श्रेणी) – 100
लघुलेखक (मराठी) ५२
स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी) 39

पात्रता :

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच टायपिंगचा वेगही चांगला असावा.

वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असावी.