---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

शिरसाळा येथे कुस्त्यांची दंगल कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे यांची भेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे श्री क्षेत्र हनुमान मंदिर संस्थान व शिरसाळा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भव्य कुस्त्यांची आम दंगल” कार्यक्रमास खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन कृस्तीचा आनंद घेतला.

kusti jpg webp

जिल्ह्यातील कृस्ती चाहत्यांसाठी हनुमान मंदिर संस्थांच्या वतीने १८ कुस्त्यीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येऊन यामध्ये जळगांव जिल्ह्या व मध्यप्रदेश राज्यातील एकूण ३६ कुस्तीपटूनी सहभाग नोंदवला होता. तसेच सदर स्पर्धेसाठी परिसरातील नामांकित कुस्तीपटू व चाहत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच सदर स्पर्धेस भुसावळ तालुका कुस्तीगीर संघ व श्री हनुमान व्यायाम शाळा वरणगांव यांचे अनमोल सहकार्य लाभले.

---Advertisement---

यावेळी खासदार रक्षा खडसे, संस्थान अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सरपंच प्रविण पाटील, राजेंद्र पाटील, रविंद्र सूर्यवंशी, संजय बोरसे, योगेश पाटील, समाधान गोसावी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---