Accident : आयशरची दुचाकीला धडक : माय-लेकी ठार, पिता-पुत्र जखमी

फेब्रुवारी 28, 2022 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । चोपडा शहरातून जाणाऱ्या धरणगाव – चोपडा रस्त्यावर आयशर आणि दुचाकी वाहनाचा झालेल्या भीषण अपघातात आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वडीलसह मुलगा जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. उज्वला जगदीश मोतीराळे (वय 37) व मुलगी नेहा जगदीश मोतीराळे (वय 12) असे मयताचे नाव आहे.

chopda dharangao road accident

नेमकी काय आहे घटना?

आज सकाळी आयसर चोपडा शहरातून धरणगावच्या दिशेने जात होता. यावेळी आयसरच्या मागे दुचाकी होती, यावेळेस दुचाकीस्वार सरळ जात असतांना आयसरने रस्त्याच्या बाजूला वळत असतांना मागून येणारी दुचाकी आयसरच्या खाली कोसळली. या अपघातात आई उज्वला मोतीराळे व मुलगी नेहा मोतीराळे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दुचाकी चालक चोपडा तालुक्यातील मामलदे येथील जगदीश भिमराव मोतीराळे(वय 40) व आवेश जगदीश मोतीराळे(वय 10) हे जखमी झाले आहे. घटनास्थळी तत्काळ चोपडा शहर पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते. आयसर चालक याठिकाणाहून फरार झाल्याचे समजते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now