मोरझिरा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; वनविभागातील मातीबांध फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान!
जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे मोरझिरा परिसरात आज दि २४ रोजी सकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस कोसळला.दरम्यान वडोदरा वनक्षेत्रातर्गत कुऱ्हा वनपरीमंडळातील मोरझिरा नियतक्षेत्रातील कं.नं.५५६ मधील सन २०१६ साली ई-टेंडर द्वारे बांधण्यात आलेला मातीबांध फुटुन आलेल्या मोठ्या पुरामुळे शेतीपरीसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीके खरळले जाऊन नुकसान झाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहीणी खेवलकर यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. सकाळच्या सुमारास धामणगाव -मोरझिरा रस्त्यावर पाणी वाहत असल्याने काही काळ संपर्क तुटला होता.या रस्त्यावर असलेला पुल पाण्याखाली आला होता.या पुलाची उंची वाढविण्यात यावी.यासंदर्भात ॲड रोहीणी खेवलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
परिसरातील तलाव,बंधारे या पावसाने तुडुंब भरले. यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ. बी. सी. महाजन, प्रदीप साळुंखे, विशाल रोटे, नितेश राठोड, जितेंद्र पाटील, ज्ञानदेव मांडोकार लहू घुळे , हरलाल राठोड, अशोक मोहिते, अजय बागल यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.