जळगाव लाईव्ह न्यूज । एरंडोल । नितीन ठक्कर । एरंडोल तालूक्यातील सोनबर्डी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी गावातून भव्य तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. समाज सुधारक यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी प्रभात फेरीची आकर्षण ठरले.
रॅलीत अनिता देवा पावरा इ.१० वी च्या विद्यार्थिनीची भारत मातेच्या वेशभूषेत सजवलेल्या बैलगाडीतून तर निलाक्षी निखार्या पावरा इ.९ वी च्या विद्यार्थिनीची झाशीची राणी या वेशभूषेत घोड्यावरून गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध आदिवासी नृत्य तसेच पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण गावात काढण्यात आलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले होते. गावात हर घर तिरंगा मोहिमेचे महत्व पटवून देत तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. जी. पाटील सर, मुख्याध्यापक डी. बी. पाटील, अधीक्षक डी. एस. राणे, पी. जी. शिंदे. डी. आर. साळुंखे, एस. एस. डाके, एल. एम. पाटील, शुभांगी मोरे, पी. एच. चव्हाण, बी. पी. चव्हाण, डी. वाय. रणवीर, पी. डी. चौधरी, जितेंद्र पाटील, अजय साबळे, आर. डी .राठोड, आर. डी. पाटील, प्रभुदास चौधरी, सरपंच रवींद्र पाटील, पो.पा. शरद पाटील आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी विनिता सोनवणे मॅडम प्रकल्प अधिकारी यावल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन कुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.