मू.जे.महाविद्यालयात १ ते ९ एप्रिलदरम्यान गायत्री महामंत्र अनुष्ठानचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । केसीई सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालय जळगाव (स्वायत्त) अंतर्गत सोहम् डिपार्टमेंट, योग नॅचरोपॅथी द्वारे सव्वालाख गायत्री महामंत्र अनुष्ठान चे आयोजन दि.१ ते ९ एप्रिल २०२२ या कालावधीत चैत्र नवरात्री निमित्त करण्यात येत आहे.
यावेळी डॉ.तनु वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 एप्रिल रोजी सायंकाळी अनुष्ठान संकल्प केला जाईल २ ते ९ एप्रिल या कालावधीत रोज सकाळी ६ ते ७ सव्वालाख गायत्री महामंत्र जप सामूहिक साधना आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळात भजन संध्या असे कार्यक्रम करण्यात येतील आणि ९ एप्रिल रोजी सकाळी अनुष्ठान पूर्णाहुतीचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या साधनेसाठी येताना साधकांनी स्वतःचे आसन आणि जपमाळ सोबत आणावी तसेच भारतीय वेशभूषा परिधान करून यावे. यात समाजातील सर्व महिला पुरुषांसाठी निःशुल्क प्रवेश असून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सोहम् डिपार्टमेंट, योग नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे.