---Advertisement---
हवामान

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! हवामान खात्याचा अंदाज आला?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ जून २०२३ । केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे. अशातचं हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

mansoon rain jpg webp

साधारण मान्सून केरळमध्ये 1 जून ला दाखल होतो. मात्र यंदा आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मान्सून केरळात धडकला, त्यानंतर केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली असून ईशान्येकडील बहुतेक राज्ये व्यापून मान्सूनने शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली.

---Advertisement---

कर्नाटकमध्ये आलेला मान्सून पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला असताना, दुसरीकडे ‘बिपरजॉय’ (Cyclone) चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. येत्या २४ तासांत बिफरजॉय चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जळगावत आज पहाटपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात 12 जून पर्यंत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, १५ जूननंतर नियमित मान्सून‎ जिल्ह्यात धडकण्याची शक्यता आहे.‎ त्यामुळे उकाड्याने घामाघूम झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---